– 13 ते 22 डिसेंबर दरम्यान 9 व्या पर्वाचे भव्य आयोजन
– केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली घोषणा
– प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर (Nitin Gadkari) : वातावरणात गारवा जसजसा वाढू लागतो तशा खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या ऊबदार आठवणी ताज्या होऊ लागतात. यावेळचा डिसेंबर महिन्यातला गारवादेखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी चांगलाच रंगतदार ठरणार असून आपल्या आठवणीत कायमचा कोरला जाणार आहे.
यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2024 चे (Khasdar Sanskrutik Mahotsav) आयोजन येत्या, 13 ते 22 डिसेंबर दरम्यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणा-या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारदेखील या मंचावर आपली कला सादर करतील.
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे नववे पर्व आहे. वर्षागणिक त्याचे स्वरूप अधिक भव्य होत असून त्याची ख्याती देशभरात पसरलेली आहे. इतर खासदारांसाठी प्रेरणादायी ठरलेला महोत्सव यंदा नवनवीन कार्यक्रमांची शृंखला घेऊन येत आहे.
उदघाटनाला अभिनेत्री काजोल यांची उपस्थिती
सलग दहा दिवसांचे भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे (Khasdar Sanskrutik Mahotsav) उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सहा फिल्मफेअर पुरस्कारांची मानकरी, ‘बाजीगर’, ‘डीडीएलजे’ अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते होणार आहे. काजोल यांची उपस्थिती यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नवी झळाळी देणारी ठरणार आहे. त्यानंतर संस्कार भारती, नागपूर प्रस्तुत ‘मै भारत हूं…’ हा भारतीय संस्कृती व लोकधारेचे दर्शन घडविणारा नागपूर- विदर्भातील कलाकार नाट्य, नृत्य व संगीतमय आविष्कार सादर करतील.
राममय होणार नागपूरकर
प्रसिद्ध हिंदी कवी, वक्ते, कथावाचक तसेच, सामाजिक-राजकीय कायकर्ते डॉ. कुमार विश्वास यांचा ‘अपने अपने राम’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 14 ते 16 डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. देश-विदेशात गाजलेल्या या तीन दिवसीय रामकथेतून डॉ. कुमार विश्वास हे वाममार्गाला जात असलेल्या युवापिढीला राममार्गावर आणण्याचे अत्यंत प्रशंसनीय कार्य करीत आहेत.
‘अभंगवारी’ व ‘अभिजात मराठी’
आषाढी पायीवारीच्या सुख सोहळ्याचे हरिभक्तांना दर्शन घडविण्यासाठी 17 तारखेला ‘अंभगवारी’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 2000 वारकरी कलाकारांच्या माध्यमातून नाट्य, नृत्य, संगीत व टाळमृदुंगाच्या गजरात रोमांचक असे उभे रिंगण सादर करतील. 18 तारखेला होणा-या ‘अभिजात मराठी’ या (Khasdar Sanskrutik Mahotsav) कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर, चार्वाक, संत तुकारामांपासून ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकरांपर्यंत सर्वांना मानाचा मुजरा करणा-या या कार्यक्रमात अजित परब, मुग्धा वैशंपायन, सावनी रविंद्र, सोनिया परचुरे, संकर्षण क-हाडे, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, गिरीजा ओक यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश राहील.
चार लाईव्ह इन कॉन्सर्ट्स
नंतर चार दिवस सलग ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट्स’ आयोजित करण्यात आल्या आहेत. 19 तारखेला उत्तर व दक्षिणेतील वाद्यांची ‘इन्स्ट्रूमेंटल फ्यूजन’ कॉन्सर्ट होणार असून त्यात निलाद्री कुमार, राकेश चौरसिया, तौफिक कुरेशी व ओजस आडिया या कलाकारांचा सहभाग राहील. 20 रोजी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पॉप रॉक संगीत समूह ‘सनम बँड’ ची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार असून यात सनम पुरी, समर पुरी, केशव धनराज, व्यंकट सुब्रमण्यम यांचा समावेश राहणार आहे. 21 तारखेला तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवुडच्या संगीतविश्वावर राज्य करणारे ‘पापा कहते है’ फेम गायक उदीत नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आणि समारोपाच्या दिवशी 22 तारखेला ‘कैसे हुआ’ फेम गायक, संगीतकार विशाल मिश्रा यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ तरुणाईला वेड लावेल.
सकाळचे भक्तीमय सत्र
मागील वर्षी प्रमाणे यंदाही (Khasdar Sanskrutik Mahotsav) खासदार सांस्कृतिक महोत्सवात 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 7 ते 8.30 वाजेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री हनुमान चालिसा पठण, श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण, श्री रुद्र पठण, श्री हरिपाठ पठण, श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21 व्या अध्यायाचे पारायण, मनाचे श्लोक, श्री सुंदरकांड पठण आणि श्रीसुक्त पठण यांचा समावेश राहणार आहे.
याशिवाय, सायंकाळच्या (Khasdar Sanskrutik Mahotsav) सत्रातील मुख्य कार्यक्रमांच्या आधी स्थानिक बाल कला अकादमीच्यावतीने स्वा. सावरकरांवर आधारित देशभक्तीपर गीत, नृत्य, नाट्याने नटलेला कार्यक्रम होणार आहे. यात शहरातील विविध शाळातील सुमारे 250 मुले गायन, वादन, नृत्य व नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करतील. तसेच, दृष्टीबाधित मुलांचा आर्केस्ट्रादेखील आयोजित करण्यात आला आहे.
कोणत्याही अडथळ्याविना या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी यंदा क्युआर कोडद्वारे मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिराती, होर्डिंग्ज इत्यादी प्रसिद्धी साधनांवर असलेला क्युआर कोड स्कॅन केल्याबरोबर www.khasdarmahotsav.com हे संकेतस्थळ सुरू होईल व तेथून त्या-त्या दिवसाची मोफत पास प्राप्त करता येतील. नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला (Khasdar Sanskrutik Mahotsav) नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांनी केले आहे.
KHASDAR SANSKRUTIK MOHOTSAV 2024
13h डिसेंबर ते 22nd डिसेंबर 2024
S.N. Date Programme
1) 13th डिसेंबर, 2024 Inaugural Function- Noted Bollywood Actress – Kajol
Sanskar Bharti Presents – ‘Mai Bharat Hu…!!
भारताची सांस्कृतिक व लोक धारा दर्शविणारा नाट्य, नृत्य व संगीतमय आविष्कार
2) 14th डिसेंबर, 2024
‘APNE APNE RAM’ – Dr Kumar Vishvas
3) 15th डिसेंबर, 2024
4) 16th डिसेंबर, 2024
5) 17th डिसेंबर, 2024 अभंग वारी – आषाडी वारीचे दर्शन घडविणारा २००० वारकरी कलाकारांचा नाट्य, नृत्य व संगीतमय अविष्कार
6) 18th डिसेंबर, 2024 ‘अभिजात मराठी’ – महाराष्ट्राचा आवाज असलेल्या मायमराठीला मानाचा मुजरा………
7) 19th डिसेंबर, 2024 Live In Concert – ‘Instrumental Fusion’ (South & North)
8) 20th डिसेंबर, 2024 Live successful Concert – Sanam Band
9) 21st डिसेंबर, 2024 Live successful Concert – Udit Narayan
10) 22nd डिसेंबर, 2024 Live successful Concert – Vishal Mishra
Programme Schedule Morning 7 to 8.30
1) 14th डिसेंबर 2024 श्री हनुमान चालीसा
2) 15th डिसेंबर 2024 श्रीरामरक्षा स्तोत्र श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण
2) 16th डिसेंबर 2024 श्री रुद्र पठण
3) 17th डिसेंबर 2024 श्री हरिपाठ पठण
4) 18th डिसेंबर 2024 श्री गणपती अथर्वशीर्ष पठण
5) 19th डिसेंबर 2024 श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ व्या अध्यायाचे पारायण पठण सोहळा
6) 20th डिसेंबर 2024 मनाचे श्लोक
7) 21st डिसेंबर 2024 श्री सुंदरकांड पठण
8) 22nd डिसेंबर 2024 श्रीसुक्त पठण