उद्धव ठाकरेंची नवनिर्वाचित आमदारांसोबत पडद्याआड बैठक, म्हणाले, ‘जरी समोर फडण’वीस’ तरी तुम्ही 20….’

2 hours ago 1

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ 46 जागांवर यश आलं आहे. तर महायुतीला तब्बल 240 जागांवर यश आलेलं आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वाधिक 20 जागा जिंकून आल्या आहेत. या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना कानमंत्र दिला. आगामी काळात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कदाचित आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतं किंवा आमदारांचं मानसिक मनोधैर्याचं खच्चिकरण होऊ शकतं. याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचादेखील उल्लेख केल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडून आलेल्या 20 आमदारांशी संवाद साधला. जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरुन उरा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. यावेळेला उद्धव ठाकरेंनी आमदारांना म्हटलं की, “जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरुन उरा.”

उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या सर्व 20 आमदारांना मुंबईत आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलवत त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, महायुतीचा कसा सामना करायचा आहे, याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या संख्याबळाचा धागा पकडत त्यांनी आमदारांना पुढील कामकाजांचा कानमंत्र दिला. विधानसभेत फडणवीस असले तरी तुम्ही संख्येने 20 आहात. तुम्ही त्यांना पुरुन उरा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जडणघडणबाबतही भाष्य केलं. “शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. ते एकमेव असतानादेखील विधानसभा गाजवत असत, पण तुम्ही तर संख्येने 20 आहात. त्यामुळे विधानसभा आपल्या भूमिकांनी आणि मुद्द्यांनी गाजवा”, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिली. या बैठकीनंतर सर्व आमदार विधान भवनाच्या दिशेला निघाले. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी हे आमदार विधान भवनाच्या दिशेला रवाना झाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article