परभणी/पाथरी(Parbhani):- तालुक्यातील दक्षिण गोदापट्ट्या मधील उमरा ,गुंज , अंधापुरी , गौंडगाव ,मसला खुर्द आदी गाव शिवारात यंदा शेतकऱ्यांचा टरबूज लागवडी कडे कल वाढला आहे .
नियंत्रणासाठी मल्चिंग पेपरचा वापर
मागील वर्षी या भागात २०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या परिसरात टरबूज पिकाची लागवड करण्यात आली होती . कमी कालावधीमध्ये अधिकचे उत्पन्न व नफा चांगला मिळत असल्याने यावेळी या भागात यावर्षी पिकांचे क्षेत्र ३०० हेक्टर क्षेत्रा पर्यंत जाईल असा अंदाज आहे. यंदा जलस्त्रोतांना (water sources) पाणी मुबलक असल्याने ऊस लागवड वाढली आहे. यात आंतरपीक म्हणून शेतकरी टरबुज लागवड करत आहेत . सोबतच पपई पिकातही आंतरपिक म्हणुन टरबुज लागवडीस शेतकरी पसंती देत आहेत. दरम्यान स्थानिक शेतकरी आधुनिक पद्धतीने पिकातील अंतर ,ठिंबक सिंचनाचा व तण नियंत्रणासाठी मल्चिंग पेपरचा वापर लागवडीसाठी करत आहेत. या भागात उत्पादीत माल दिल्ली आसाम पर्यंत पाठवला जात असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे .