वडीलांकडून 17 वर्षीय स्वत:च्या मुलीवर राहत्या घरात बलात्कार:धमकी देत वारंवार अत्याचार, पुण्यातील काेंढवा पारिसरातील घटना
1 hour ago
1
वडील व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील काेंढवा पारिसरात घडली आहे. स्वत:च्या 17 वर्षीय मुलीवर वेळाेवेळी बलात्कार करुन तिच्यासह कुटुंबियांना घराबाहेर काढण्याची धमकी देत घडलेला प्रकार काेणाला सांगू नकाे अशी धमकी देखील वडीलांनी दिली. परंतु सततच्या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने याबाबत काेंढवा पोलिसांकडे वडीलांविराेधात तक्रार दाखल केली आहे. काेंढवा पोलिसांनी याबाबत 37 वर्षीय वडिलांवर बलात्कार व पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आणि तिची इच्छा नसताना वडीलांना तिला राहत्या घरात एकटी असताना हाताने मारहाण केली. बळजबरी व जबरदस्ती करुन घरात काेणाला ही काहीही सांगायचे नाही, नाहीतर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणिन अशी धमकी देऊन वडीलांनी तिच्यावर डिसेंबर 2023 पासून आतापर्यंत वारंवार शरीरसंबंध ठेऊन तिला शारिरिक व मानसिक त्रास दिला आहे. याबाबत घटनेची माहिती मिळाल्यावर काेंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मुलीकडे अधिक चाैकशी केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बाबर करत आहे. लग्नाचे अमिषाने मुलीवर बलात्कार एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासाेबत इच्छा नसताना वारंवार शारिारिक संबंध तरुणाने ठेवल्याचा प्रकार घडला आहे. मुलीने नकार दिला असता तिला मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच मुलीने आराेपी तरुणाचे फाेन उचलला नाही त्यामुळे आराेपीने सदर दाेघांचे शारिरिक संबंध करतानाचे बनवलेले व्हिडिओ हा मुलीच्या मावशीच्या व्हाॅटसअपवर पाठवला आहे. तसेच मुलगी ही तरुणासाेबत बाेलली नाही तर शारिरिक संबंध करतानाचा बनविलेला व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी आराेपी तरुणा विराेधात हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)