तीन महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीजवळ झुडपात सोडलेFile Photo
Published on
:
25 Nov 2024, 10:17 am
Updated on
:
25 Nov 2024, 10:17 am
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपुरातील पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील पवनपुत्र नगर वार्ड नं.1 येथील पाण्याच्या टाकीजवळ झुडपात एक तीन महिन्यांची मुलगी आढळून आल्याने खळबळ माजली. नेमके हे बाळ कुणाचे, कुणी ते या ठिकाणी आणून ठेवले याबाबत आता पोलिस सीसीटीव्ही माध्यमातून तपास करीत आहेत.
हे बाळ कपड्यावर ठेवले होते. सदर मुलीस कानाचे बाजूला व डोक्याच्या पाठीमागे किरकोळ जखमा झाल्या आहेत. यासोबतच अंगावर ओरबडलेले दिसत आहे. तिला पुढील उपचाराकरीता मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, तूर्त मुलीची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांनी सदर मुलगी ही साधारण 3 महिन्यांची असल्याचे सांगितल्याची माहिती हुडकेश्वर पोलिसांनी दिली.