देवेंद्र फडणवीस यांना पुरुन उरा:उद्धव ठाकरे यांचा पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना कानमंत्र; खबरदारी म्हणून लिहून घेतले शपथपत्र

2 hours ago 1
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त 20 आमदारांनी मार्गदर्शन केले. विधानसभेत जरी समोर फडणवीस असले, तरी तुम्ही 20 आहात. त्यांना पुरून उरा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. तसेच नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते यांची निवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक 20 आमदार निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित 20 आमदारांची उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव माहडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. त्यावेळी त्यांनी एकटे असूनही विधानसभा गाजवली होती. पण तुम्ही आता 20 आहात, त्यामुळे आपल्या मुद्द्यांनी आणि भूमिकेने विधानसभा गाजवा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले. पक्षफुटीचा धोका! उद्धव ठाकरेंनी आमदारांना केले शपथबद्ध दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर तसेच पक्षफुटीचा मोठा अनुभव घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे विजयी आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतल्याची माहिती आहे. दगाफटका होऊ नये तसेच पक्षफुटीचा धोका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांकडून हे शपथपत्र लिहून घेतले. पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार, पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असतील, अशा आशयाचे हे शपथपत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतल्याची माहिती आहे. प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते नियुक्त या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते निवडण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. सुनिल प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश विनम्रपणे स्वीकारावा लागतो. अन्यथा आदित्य ठाकरे यांची विधानसभा गटनेते पदी निवड व्हावी, असे माझे मत होते, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article