अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. मात्र ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. अशातच ‘कायम स्वतःसाठी उभे रहा,’ असा संदेश देणारा ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या स्वतःची बाजू मांडताना दिसत आहे.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराविषयी भाष्य करताना दिसतेय. त्यात ऐश्वर्याने म्हटलेय की, ‘रस्त्यावर होणाऱ्या छळाचा सामना कसा करावा? त्या नजरांना टाळावे? नाही. सरळ त्या नजरांच्या डोळय़ांत डोळे घालून पाहा. आपली मान कायमच उंच ठेवा. स्त्रीवादी… माझं शरीर…माझी किंमत…तुमच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नका…स्वतःवर संशय घेऊ नका. स्वतःसाठी उभे रहा. तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका, असे ती एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहे.