ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावले, युट्युब पाहून शिकले वाहन चोरी:पोलिसांकडून टोळी जेरबंद, 26 लाखांच्या 18 दुचाकी हस्तगत

2 days ago 2
मोबाईलवर अॅवेटर हा ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागलेल्या तरुणाने गेममध्ये लावलेले पैसे गमावले. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्याने युट्युब पाहून वाहनचोरी करण्याचे तंत्र आत्मसात करत, वाहनचोरी करुन ती वाहने कमी किंमतीत विक्री करुन त्यातून मिळालेल्या पैशातून पुन्हा ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन पैसे गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दऱम्यान, वाहनचोरी करुन त्याची विक्री करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 26 लाख रुपयांच्या 18 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. अभय सुरेश खर्डे (वय-23 रा. झोळे, ता.संगमनेर, अहमदनगर, सध्या रा. गुंजाळवाडी रोड, संगमनेर, जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास चोरीच्या गाडया विक्री करण्यासाठी मदत केल्याने शुभम बाळासाहेब काळे (वय-24,रा.कोपरगाव, अहमदनगर), रविंद्र निवृत्ती गव्हाणे (23, रा.आंजनापूर, ता.कोपरगाव, अहमदनगर), यश नंदकिशोर थुट्टे (22, रा.चिखली, बुलढाणा, सध्या रा.अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (20, रा.नाशिक) या आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. पुणे-नाशिक रस्त्यावर चाकण पोलीस ठाण्याचे हद्दीत बुलेट गाडया चोरीचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले होते. याबाबत दाखल झालेल्या एका गुन्हयाचा तपास पोलीस करत असताना त्यांनी चोरटयांचा माग काढण्यासाठी सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत ते संगमनेर पर्यंत पोहचले. त्यावेळी संशयीत आरोपी अभय खर्डे यास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने चाकण भागातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. साथीदारांचे मदतीने वाहने विक्री केल्याचे त्याने सांगितल्यावर पोलिसांनी 26 लाखांची 18 वाहने जप्त केली. यात 11 बुलेट, सहा सप्लेंडर व एक यामाहा दुचाकीचा समावेश आहे. चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे यांच्या पथकाने केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article