कर्मचारी मतदान यंत्रे घेऊन मतदान केंद्रावर रवाना:4000 कर्मचारी, 387 वाहनांचा समावेश, पोलिसांचेही राहणार विशेष लक्ष

3 days ago 2
हिंगोली जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघात भोजनाचा अस्वाद घेऊन कर्मचारी मतदान यंत्रे घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. बुधवारी ता. २० जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघात १०१५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान शांततेत व्हावे यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदार संघात बुधवारी ता. २० सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात होणार आहे. जिल्हयातील १०१५ मदान केंद्रावर ९.८४ लाख मतदार मतदान करणार अाहेत. यावेळी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. दरम्यान, मतदान केंद्रावर नियुक्त असलेले कर्मचारी सकाळपासूनच दाखल झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, प्रतिक्षा भुते, विकास माने यांनी कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात नियुक्त झालेल्या ४००० कर्मचाऱ्यांनी भोजनाचा अस्वाद घेतल्यानंतर कर्मचारी त्यांंना दिलेल्या वाहनाद्वारे मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ३८७ वाहने सज्ज केली असून यामध्ये १२२ क्रूझर जीप, ६५ एसटी बस, ४१ मीनीबस, १७ जीप असून इतर २७ वाहने राखीव ठेवण्यात आली आहेत. तर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी ११५ जीप ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील केंद्रावर प्रथमोपचार पेटीसह आशा कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या असून तातडीची गरज भासल्यास संदर्भ सेवेसाठी रुग्णवाहिका नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह, ग्रामीण रुग्णालयात तैनात ठेवण्यात आल्या आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article