काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारामुळे इम्तियाज यांचा मतदारसंघ ठरेना:काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख यांची ‘मध्य’मधून विधानसभेची तयारी सुरू‎‎

1 hour ago 2
आगामी विधानसभा निवडणुकीच्या‎पार्श्वभूमीवर राज्यासह छत्रपती संभाजीनगरचे‎राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली‎आहे. असे असतानाच चर्चा रंगत आहे ती‎एमआयएमच्या उमेदवारांची. अशातच मध्य‎विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले‎एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील‎यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.‎मात्र उमेदवारी घोषित केली तरी त्यांचा‎मतदारसंघ अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे जलील‎कोठून लढणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू‎आहे.‎ दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस ‘मध्य’‎अथवा ‘पूर्व’ या दोन्ही मतदारसंघांपैकी एका‎जागेवर मुस्लिम उमेदवार देणार आहे. त्यामुळे‎काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यास‎मतविभाजनाची शक्यता आहे. त्यामुळे जलील‎ यांच्या मतदारसंघाच्या घोषणेचा निर्णय‎लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.‎ लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील‎यांचा पराभव झाल्यानंतर जलील विधानसभा‎निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली‎होती. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पाच‎उमेदवारांची घोषणाही केली. मात्र,‎महिनाभरानंतरही जलील यांचा मतदारसंघ‎अजून ठरलेला नाही. शहरातल्या तीन जागांपैकी‎काँग्रेसने ‘मध्य’ आणि ‘पूर्व’ या दोन्हींपैकी एक‎मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही भूमिका‎घेतली आहे. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ‎शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून ‘मध्य’मधून‎कामही सुरू केले आहेत. त्यामुळे दोन्हींपैकी एक‎मतदारसंघ काँग्रेसला सुटणार हे निश्चित आहे.‎त्यामुळे एकाच वेळी दोन उमेदवार समोरासमोर‎आले तर मतविभाजनाचा फटका बसू शकतो.‎ पक्षाच्या स्तरावर निर्णय होईल‎ पक्षाने उमेदवारी दिली असली तरी मतदारसंघ‎ कोणता याचा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेतला ‎जाईल. ‘मध्य’, ‘पूर्व’ तसेच भिवंडी या तिन्ही‎ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मागणी ‎आहे. -इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष,‎एमआयएम.‎ मध्यसाठी मागितली उमेदवारी‎ काँग्रेसने शहरातल्या तिन्ही मतदारसंघातील‎ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरून घेतले आहेत.‎मध्यमधून दहा जणांनी अर्ज भरले आहेत.‎मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.‎गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही लोकांच्या‎प्रश्नावर आंदोलनदेखील करत आहोत.‎ -युसूफ शेख, शहराध्यक्ष, काँग्रेस काँग्रेसने शहरातल्या तिन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज घेतले भरून‎ लोकसभा निवडणुकीत इम्तियाज यांना‎पूर्व मतदारसंघात सर्वाधिक मते‎मिळाली होती. पूर्वमध्ये इम्तियाज यांना‎८९१४३, तर खासदार संदिपान भुमरे‎यांना ६३२२८ आणि चंद्रकांत खैरे यांना‎३८३५० मते मिळाली होती. मध्य‎मतदारसंघात इम्तियाज यांना ८५९३७‎मते मिळाली होती. भुमरेंना ५९७४०‎आणि खैरे यांना ४३४८० मते मिळाली‎होती. विशेष म्हणजे इम्तियाज यांनी‎लोकसभा निवडणुकीनंतर पूर्व‎मतदारसंघातून चाचपणीदेखील केली ‎होती.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article