कांदा उत्पादकांना लक्ष्मी प्रसन्न:कळवणमध्ये शेतकऱ्यांकडून घटस्थापनेला 250 ट्रॅक्टर, 39 कार, 47 इतर वाहने व 350 दुचाकींची खरेदी

2 hours ago 1
कांद्याला सहा महिन्यांपासून क्विंटलला दोन ते पाच हजारांच्या दरम्यान भाव मिळत अाहे. यामुळे कळवण तालुक्यात शेतकऱ्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली असून घटस्थापनेचा मुहूर्त साधत एका दिवसात २५० ट्रॅक्टर, ३९ कार, ४७ विविध वाहने व ३५० दुचाकींची खरेदी झाली. सुमारे ३६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यातील २३ काेटी ४० लाख रुपयांचे व्यवहार राेखीने झाले आहेत. एरवी नवरात्राेत्सवात ६० ते ७० ट्रॅक्टर विक्री हाेते, या वर्षी त्यात चाैपट वाढ झाली. एक ट्रॅक्टर ट्राॅली (२५ ते ३० क्विंटल) कांदा विक्रीस नेल्यास सध्याच्या बाजारानुसार ३००० ते ४००० बाजार भावानुसार एक ते सव्वा लाख रुपये शेतकऱ्याच्या हातात येत आहेत. कांद्यासाेबतच डाळिंब, कोथिंबिरीला मिळाळेला चांगला भाव तसेच अण्णासाहेब पाटील व ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीच्या कर्जावर मिळणारा व्याज परतावा व त्याबाबतची माेफत प्रक्रिया यामुळे बागलाण तालुक्यात घटस्थापनेस शेतकऱ्यांनी १०३ ट्रॅक्टर, १२४ माेटारसायकल व ४० इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी केली. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य दिसले. अशी झाली वाहन विक्री व उलाढाल ४७ इतर वाहने : ४.७० कोटी रुपये ... तर शेतकरी राजा हाेईल कांद्याला असलेल्या भावामुळे या वर्षी चांगला पैसा मिळाला आहे. यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर व चारचाकी खरेदी केली आहे. असेच भाव शेतमालाला कायम असले तर शेतकरी जगाचा राजा होईल. - सुधाकर जाधव, शेतकरी, भादवन २०१९ नंतरचा मोठा विक्रम कांद्याचे वाढलेले भाव व अण्णासाहेब पाटील आणि ओबीसी महामंडळांच्या शासकीय कर्ज सुविधा यामुळे कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाहन खरेदीत विक्रम केला अाहे. ही २०१९ नंतरची सर्वाधिक विक्री आहे. - सुनील संचेती, ट्रॅक्टर विक्रेते आजही शेतकऱ्यांकडे १२ लाख १५ हजार क्विंटल कांदा शिल्लक एक ट्रॅक्टर ट्राॅली कांदा विक्रीतून एक ते सव्वा लाख रुपये यंदा ८१ लाख क्विंटल कांदा उत्पादन गेल्या हंगामात कळवण तालुक्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. त्यातून हेक्टरी साधारण ३०० क्विंटलप्रमाणे ८१ लाख क्विंटल कांद्याचे उत्पादन घेण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article