कालच्या निकालाबद्दल जनतेच्या मनातही प्रश्न:दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करू- नाना पटोले
3 hours ago
1
काल जो निकाल लागला त्याचे आम्हालाही आश्चर्य आहे, पण जनतेच्या मनातही प्रश्न आहेत. याबाबत आम्ही दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करू असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले म्हणाले की, सोशल मिडियावर लोक म्हणत आहेत की हे जनतेचं सरकार नाही. लोकांमध्ये ही जनभावना निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात महत्त्वाची असते. हे जनतेच्या मतांच सरकार नाही, असे जर खुद्द जनता म्हणत असेल तर कुठे ना कुठे तरी दाल मे काला है. त्यामुळे यासंदर्भात हायकमांडशी चर्चा करावी त्यासाठी मी दिल्लीला चाललोय. सभांना गर्दी नसताना मते मिळाली कशी नाना पटोले म्हणाले की, कालच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेतेही चर्चा करतील. राज्यातला निकाल हा धक्कादायक आहे, राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आश्चर्य आहेच पण सर्वसामान्यांनाही प्रश्न पडला आहे. भाजपचे हायकमांड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना गर्दी होत नव्हती तरी त्यांना मतं कशी मिळाली हा प्रश्न लोकांना पडला आहे. दिग्गजांचा पराभव बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)