काश्मीर खोऱ्यात विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा:श्रीनगरमधील रावण दहन कार्यक्रम ठरले आकर्षण

5 days ago 3
काश्मीर खोऱ्यात विजयादशमी (दसरा) उत्सव मोठ्यात उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्या वतीने दसरा मोहत्सव 2024 निमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. हजारो काश्मिरी नागरिकांनी रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियम येथे या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा काश्मिर खोऱ्याला लाभला आहे. त्याला चालना देण्यासाठी श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्या वतीने गत वर्षीपासून ‘दसरा मोहत्सव’ सुरू करण्यात आला आहे. वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचे प्रतिक म्हणून यावर्षी या मोहत्सवात रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या प्रतिकात्मक दहन करण्यात आले. काश्मीर खोऱ्यातील हा एकमेव विजय दशमी उत्सव असल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांबरोबर येथील समाजातील सर्व घटकांतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रावण दहन कार्यक्रम आता काश्मिरी पंडित आणि मुस्लिम यांच्यातील सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे, ज्यामुळे विविधतेतील एकतेच्या कल्पनेला बळकटी मिळाली आहे. याबाबत पुनीत बालन म्हणाले, वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर नीतिमत्तेच्या विजय म्हणजेच विजयादशमी. काश्मीर खोऱ्यात एकजुटीची भावना आणि सांस्कृतिक वारशाला चालना मिळावी या भावनेतून दसरा मोहत्सव सुरू करण्यात आला आहे. येथील नागरिकांचा या मोहत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article