कोल्हापूरच्या सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज:श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे निधन

5 days ago 3
फलटण येथील ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा बंटीराजे खर्डेकर (वय ७९) (मूळ रा. कोल्हापूर) यांचे शनिवारी रात्री फलटण येथे अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे ते बंधू, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा तथा सासरे तर, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे ते वडील होते. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज असलेल्या बंटीराजे खर्डेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी फलटण येथे साईराजा फ्रुट अँड फूड प्रोसेसिंग कंपनीची स्थापना करून या कंपनीचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला. त्यांना शेतीची विशेष आवड होती. त्यांनी फलटण येथील श्रीराम साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पदही भूषविले. नेहमी हसतमुख असणारे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून बंटीराजे खर्डेकर यांना ओळखले जाई. बंटीराजे यांनी असंख्य गोर- गरीब, गरजू लोकांना सढळ हाताने मदत केली. हृदयविकार असलेल्या रुग्णांना त्यांनी विशेष करून नेहमीच मोठे आर्थिक साहाय्य केले, हृदयाच्या शास्त्रकिया मोफत करून देण्यासाठीही त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी वैशालिनिराजे, मुलगा दिप्तीमानराजे, मुलगी वेदांतिकाराजे भोसले, जावई शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुन, नातवंडे असा परिवार आहे. बंटीराजे यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता साईराजा फॅक्टरी, फरांदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article