Published on
:
04 Feb 2025, 7:26 pm
Updated on
:
04 Feb 2025, 7:26 pm
नागपूर : भारत इंग्लंड दरम्यान 6 फेब्रुवारी रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सदर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मनोहर हेमदास वंजारी (वय 62 वर्ष रा. गांधीबाग) आणि राहुल भाऊदास रामटेके (वय 38 वर्ष रा. दत्तवाडी) हे दोघे तिकिटांचा काळाबाजार करीत असताना सापडले.
आपण विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे कर्मचारी असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करून, विदर्भ क्रिकेट असोसिएशनने एकदा विक्री केलेली तिकिटे ही पुन्हा चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करून लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस येताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.