क्रीडा:शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने फुटबॉलमध्ये मिळवली चॅम्पियनशिप

4 days ago 3
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठआंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा (मुले) मध्ये शिवाजी महाविद्यालय संघाने फुटबॉलमध्ये चॅम्पियनशिप जिंकली. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,शेगाव येथे झालेल्या झोन बीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात संत मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हाच्या संघाला ट्राय बेक्ररमध्ये हरवले त्यानंतर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावतीला झालेल्या झोन फायनलमध्ये जी.एस. टोम्पे महाविद्यालय ,चांदुर बाजार च्या बलाढ्य संघाला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने मध्यंतरानंतर पेनाल्टी किक द्वारा १-० अशी बढत घेतली. विजय गोल तसबुर खान या खेळाडूंनी करून पहिल्यांदाच या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले व चॅम्पियनशिप जिंकली. अकोला च्या संघातील खेळाडू मोहीम खान (कप्तान), अश्फाक बेहेरेवाले(गोलकीपर) साद अहमद, माजिद खान, शेख जरीर ,मो. आवेस,मो. बिलाल तसवीर खान , वजाहत अहमद ,खिजर ,राज, मोहम्मद दानिश, मोहम्मद अर्ष, अरबाज हुसेन ,मो. साद ,मो. शहरोज, शेख शहबाद ,शेख जाहिद ,अबित शहा ,समीर या खेळाडूंनी आपसी तालमेल, परफेक्ट पासेस स्ट्रॉंग डिफेन्स आधारे खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. महाविद्यालयात फुटबॉल संघाचे स्वागत केले याप्रसंगी दिलीप इंगोले यांनी खेळाडूंचा सन्मान केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला सतीशचंद्र भट्ट जावेद अली(फुटबॉल खेळाडू), सुरज कुमार दुबे(राज्य क्रीडा मार्गदर्शक), प्राचार्य डॉ. किरण खंडारे आणि डॉ.आनंदा काळे उपस्थित होते. खेळाडूंना सुविधा ः फुटबॉलच्या सर्व खेळाडूंना बक्षीस म्हणून ट्रॅक सूट आणि शूज देण्याची घोषणा प्राचार्यांनी केली. खेळाडूंना विशेष सुविधा पुरवण्याचे आश्वासनही याप्रसंगी त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संजय काळे केले. आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक नितीन वाघमारे यांनी मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article