खड्डाकार.. खड्डाकार.. तुम्ही कसे व्हाल आमदार?:न्यू बालाजीनगरात नागरिकांची संजय शिरसाटांविरोधात बॅनरबाजी

2 hours ago 1
‘कावळ्याच्या हाती दिला कारभार, त्याने...’, या म्हणीसह ‘खड्डाकार.. खड्डाकार तुम्ही कसे होणार आमदार’ अशी बॅनरबाजी करत न्यू बालाजीनगरमध्ये पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाट यांचा निषेध केला आहे. महुनगर, सौजन्यनगर, न्यू बालाजीनगरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सौजन्याने हे बॅनर लावल्याचे त्यावर नमूद आहे. खोदलेले रस्ते, अपूर्ण कामांमुळे त्रास होत असून पुन्हा इतका त्रास नको म्हणून या वेळी आपण घरीच बसा, असे म्हणत शिरसाटांना ‘खड्डाकार’ उपाधीही दिली. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आमदारांच्या कामगिरीवर नाराज नागरिक बॅनर झळकवत आहेत. न्यू बालाजीनगरात आ. शिरसाटांचा निषेध करणारे बॅनर झळकले आहे. त्यांच्या काँट्रॅक्टर असलेल्या स्वीय सहायकावरही नाराजी आहे. बॅनरवर रस्त्यांच्या दुरवस्थेचे फोटोही लावले असून जाहीर निषेध लिहिले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article