खरीप 2023 ची पीक विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार:राज्य शासनाकडून 1927.52 निधीची तरतूद

2 hours ago 1
खरीप 2023 हंगामातील थकित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी राज्य शासनाने 1927.52 निधीची तरतूद केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाने केलेला पाठपुरावा व आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे अशी माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. खरीप 2023 या हंगामात दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. मात्र दीड वर्ष होऊन गेले तरी विमा कंपनीकडून पीक विम्याचे पैसे मिळत नसल्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली. एक ऑगस्ट 2024 रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात आले होते. 9 सप्टेंबर रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला होता. या मोर्चात, पैसे न मिळाल्यास राजकीय पुढाऱ्यांना गावातील सभेत "जाब विचारण्याचे' आंदोलन जाहीर केले होते. त्याचा परिणाम झाला व 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाने, शासन निर्णय करून फक्त ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची थकबाकी अदा करण्यासाठी 1927.52 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली आहे. कृषी आयुक्त कार्यालयाला सदरची रक्कम त्वरित वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदरची रक्कम लेखा परीक्षा विभागाकडे, अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीद्वारे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून वर्ग करण्यात येईल. या निर्णयाचा फायदा नाशिक, नगर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आठ ते दहा दिवसात विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय प्रबंधक दीक्षित यांनी घनवट यांना दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article