खासदार निलेश लंकेंचा सुजय विखेंवर हल्लाबोल:म्हणाले - मांजराने वाघाचे झुल घातले म्हणजे वाघ होत नसतो, ते जनता ठरवते

2 days ago 2
मांजराने वाघाचा झुल पांघरले म्हणजे तो वाघ होत नसतो, ते जनतेने ठरवायचे असते, अशा टीका खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर केली आहे. खरा वाघ कधी सांगत नसतो, मी वाघ आहे. म्हणून नगरमधील जनतेने ठरवले आहे कोण वाघ आहे, असे म्हणत लंके यांनी सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात बदल अटळ निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. निलेश लंके म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तसेच राज्यांमध्ये बदल अटळ आहे, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. बेरोजगारी शेतकरी तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यांमध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका लंके यांनी महायुती सरकारवर केली. ...म्हणून आमच्या पक्षात इनकमिंग वाढले लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांचा सर्वाधिक स्ट्राईक होता. शरद पवार साहेबांकडे गेलो की आपण निवडून येऊ शकतो, असे अनेकांना वाटत असल्याने आमच्या पक्षात इनकमिंग वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 9 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. या यात्रेद्वारे राज्यातील कायदा व्यवस्था, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, युवकांमध्ये वाढलेली बेरोजगारी, महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणारे उद्योग, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी जनतेसमोर मांडण्यात आल्या. 24 दिवस चाललेल्या शिवस्वराज्य यात्रेने 19 जिल्हे पूर्ण केले आहे. दरम्यान, आज इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेची सांगता होणार आहे. या सभेला सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहेत. हेही वाचा... अजितदादांना युगेंद्र पवार देणार आव्हान?:बारामतीच्या मैदानात पुन्हा पवार विरुद्ध पवार; 64 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. पण तसे झाले तर ही काही पवार विरुद्ध पवार अशी पहिली निवडणूक नाही. 64 वर्षांपूर्वीही अशी निवडणूक झाली आहे. पूर्ण बातमी वाचा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article