खून करून मृतदेह बॉक्समध्ये लपवत बॉक्स फेकला कॅनॉलमध्ये:आर्थिक वादातून खून केल्याचे निष्पन्न, आरोपी जेरबंद

5 days ago 3
तरुणाचा खून करुन त्याचे हात पाय रस्सीने बांधून मृतदेह खोक्यात भरून प्लॅस्टीकच्या चिकटटेपने चिकटवून कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके सापडल्यानंतर त्या तरुणाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्याचा खून करणार्‍यालाही हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निजामुद्दीन पटेल (30 रा. हांडेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. इम्रान यासीन पटेल (24, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ आसीफ मेहबुब पटेल (29, रा. रॉयल मॅरेज हॉल समोर, थेऊर फाटा, गाढवे मळा) याने फिर्याद दिली आहे. हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके नागरिकांनी पाहिले. तरुणाचे हात पाय बांधण्यात आले. खोके बंद करून ते कालव्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. याबाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार त्या बॉक्समधील तरुणाचा खून झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविला. याच दरम्यान हडपसर पोलिसांनी पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला कोणत्या पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार आली आहे का ? याची विचारपूस केली. त्यावर हडपसर पोलिसांना एक तरुणाची कोंढवा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली असल्याचे त्यांना समजले. त्या अनुषंगाने संबंधित बेपत्ता तरुणाच्या घरच्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना मृतदेह दाखविण्यात आल्यानंतर तो मृतदेह इम्रान याचाच असल्याचे सांगितले. पुढे तपास करत असताना हडपसर पोलिसांना त्याचे निजामुद्दीन पटेल याच्यासोबत आर्थिक वाद होते. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर मृतदेह सापडल्याच्या आधल्या दिवशी संध्याकाळी निजामुद्दीन याने इम्रान याला बोलवून घेतले होते. तेथे त्यांच्या आर्थिक देवाण घेवाणीवरून वाद झाले. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणादरम्यान निजामुद्दीन याने जवळच असलेल्या लोखंडी वस्तूने त्यास मारहाण केली. त्यामुळे इम्रान बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. निजामुद्दीने त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. त्याने स्वतःला वाचविण्यासाठी इम्रानेचे हात पाय बांधून त्याला एका कागदी बॉक्समध्ये भरले. नंतर त्याला हडपसर येथील हिंगणे मळा येथील कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे निदर्शनास आले. हा खुनाचा प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article