गरोदर माता, ज्येष्ठांना थेट आत जाण्यास मुभा:करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडेंची माहिती
1 day ago
1
अधिकाऱ्यांसह निवडणूक कर्मचाऱ्यांना १०२ वाहनांतून बूथवर पोहोच करण्यात आले. याच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी संबंधित ठिकाणी पोहोच केले गेले तर तालुक्यातील एकूण ३४७ बूथपैकी ३६ केंद्रांवर शेड उभारण्यात आला आहे. तर प्रत्येक केंद्रावर पाणी व रॅम्पची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये गरोदर महिला व वृद्धांना थेट प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी दिली. यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी १४ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक डीवायएसपी, तीन पोलिस निरीक्षक व १० पोलिस उपनिरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संरक्षण दिले जात आहे. त्यांच्या माध्यमातून ३४२ पोलिस व २६६ होमगार्ड व एसआरपी फोर्स १८ पथक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील ११८ व माढा तालुक्यातील ३६ गावे असे एकूण १५४ गावांचा करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. यामध्ये एकूण तीन लाख २८ हजार ९९४ मतदारांची नोंद झालेली आहे. यासाठी तालुक्यात २४३ व ३६ गावांमधून १०४ केंद्र उभा करण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत माथेफिरूने मशीनवर हातोडा मारल्याने यंदा करमाळा शहरातील केवळ एक बूथ क्रमांक ९२ हा संवेदनशील म्हणून घोषित केला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)