गुरुकुंज मोझरी बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर; नागरिक त्रस्त:प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर

1 hour ago 1
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुरुकुंज मोझरी बसस्थानकाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असून, सायंकाळनंतर येथे प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी शहर ग्रामीण भागातील शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा आदी गावांसह अमरावती शहराला जोडल्या गेले आहे. येथून दररोज हजारो विद्यार्थी व प्रवासी येथील बसस्थानकातून प्रवास करतात. येथून लांब पल्ल्याच्या बसही मोठ्या प्रमाणात सुटतात. परंतु बसस्थानकात प्रवाशांसाठी सुविधा असूनही वरिष्ठांचे नियंत्रण, वारंवार पाठपुरावा; दुरुस्ती नाही ^बसस्थानकावरील समस्यांबाबत वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. -रसिका देशमुख, वाहतूक नियंत्रक, गुरुकुंज मोझरी देखरेख व स्वछतेअभावी घाणीचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सद्य:स्थितीत गुरूकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. त्यामुळे गुरूदेवभक्तांची वर्दळ येथे दिसून येत असून याबाबत त्यांनीही संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मोझरी विकास आराखड्याअंतर्गत लाखोंचा निधी खर्च करून राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत प्रशस्त बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, महामंडळ प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे सायंकाळनंतर येथे प्रवाशांसह, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समस्या निकाली काढण्याची मागणी स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी प्रवाशांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृहाच्या बाहेर आडोसा शोधण्याची वेळ आली आहे. प्रवाशांसाठी असलेले वॉटर फ्रीझर देखील नादुरुस्त आहे. बसस्थानकात पहाटे व सायंकाळी अनेकदा एसटी बस प्रवेश करत नसल्याने प्रवाशांना महामार्गालगत उभे राहून एसटीची वाट बघावी लागते असतात. महामंडळाने गैरसोयींची व समस्यांची दखल घेत त्या त्वरित निकाली काढण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अंधारासह स्वच्छतागृहाचीही समस्या ^गुरुकुंज मोझरी बसस्थानक परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. स्वच्छतागृहात सर्वत्र घाण पसरलेली असते. -योगेश टाले , प्रवासी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article