गुरू- शिष्याचा भक्तिमय सोहळा; पालखी उत्सवात भक्त तल्लीन:नरसिंग महाराजांच्या पालखीचे उमरा येथे उत्साहात आगमन

1 day ago 2
अकोट तालुक्यातील उमरा येथे नरसिंग महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. या सोळ्यात गुरू शिष्याच्या भक्तिमय सोहळ्यात भक्त तल्लीन झाल्याचे दिसून आले. महोत्सावनिमित्त रोज भजन, प्रवचन, हरिपाठ, भारुड, नाम संकीर्तन होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी श्री नरसिंग महाराजांची पालखी श्री गुरु पुजेसाठी (संदल) उमरा येथे पोहोचली. अनंतराव देशमुख यांचे सहभागात दुपारी ३ वाजता पालखीचे पूजन जयंत उगले यांनी केले. गुरू शिष्याच्या या भक्तिमय पालखी सोहळ्यात उमरावासी तल्लीन झाल्याचे दिसून आले. जागोजागी गावातून रांगोळी काढण्यात आली. अनेक ठिकाणी सोहळ्याचे पूजन झाले. आरती ओवाळण्यात आली. पालखी सोहळा मियांसाहेब यांच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तरुणांकडून स्वागत करण्यात आले. तख्त पूजा आटोपल्यानंतर उगले व ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या भाविकांसाठी चहा वितरीत करण्यात आली. सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आज विविध कार्यक्रम : श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवांतर्गत बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समारोप २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बुधवार, २० नोव्हेंबर रोजी श्री नरसिंग महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी श्री नरसिंग महाराजांची पालखी सकाळी ९ वाजता अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात निघेल. पालखीला श्री नरसिंग मंदिरातून प्रारंभ होईल. दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणूक श्री मंदिरात परत येईल व नंतर गोपाळकाला (दहीहांडी) तसेच महाप्रसादाचे वितरण होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी श्री हरीनाम सप्ताहाची समाप्ती सकाळी ९ वाजता प्रभाकर बुवा सरोदे (आकोट) यांचे काल्याचे कीर्तनाने होणार आहे. जो जो जायचा घेतला गुण, तो तो गुरू म्या केला जाण गुरू-शिष्याचे आदर्श उदाहरण अकोट नगरीचे संतश्रेष्ठ श्री नरसिंग महाराज व त्यांचे गुरू श्री मियासाहेबजी उमरा येथे पहावयास मिळते. गुरूंची ही समाधी अकोटात कळस बसण्यापूर्वी त्यांची पालखी उमरा येथे दर्शनासाठी येते. या परंपरेप्रमाणे सोेहळा दाखल झाला. सेवा करायला मिळते हे आमचे भाग्य असल्याचा भाव ग्रामस्थांमध्ये आहे. दायित्व म्हणून पालखी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते, असाही भाव असतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article