गो-ग्रीन’योजनेतून 22 हजार 891 वीजग्राहक मालामाल:वर्षाला 27 लाखांची बचत, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात चांगला प्रतिसाद

5 days ago 2
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पर्यावरणस्नेही जवळपास 22 हजार 891 वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक 27 लाखांहून अधिक रकमेचा थेट फायदा होत आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 22 हजार 891 पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ उपक्रम पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारेही वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइन पद्धतीने लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी होऊन आर्थ‍िक बचत करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनास हातभार लावण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. गरजेनुसार वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांना ‘गो-ग्रीन’ उपक्रमाचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article