पुढारी माध्यम समूह गेल्या दोन वर्षांपासून राईज अप हा महिलांसाठी असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांचा उपक्रम यशस्वीपणे आयोजीत करत आहे. यंदाही राईज अप सीझन ३ आयोजित केला असून यंदा राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर, परभणी, रायगड, धाराशिव, लातूर, सातारा, अहिल्यानगर, अमरावती, जळगाव, धुळे, रत्नागिरीअशा विविध जिल्ह्यांतून या स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
दहा वर्षाखाली, ११ ते १५ वर्षे, १६ ते २० वर्षे आणि खुला गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून सर्व स्पर्धकांना या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
यंदाच्या स्पर्धेचे पहिले वैशिष्ट्य
गेली दोन वर्षे जिल्हास्तरीम स्पर्धा आयोजित केल्यावर या वर्षी मात्र महाराष्ट्रातील अधिक मुलांना, महिलांना या स्पर्धेत सहभाग घेता यावा महणून ही स्पर्धा राज्यस्तरावर होणार आहे. आणि सर्व स्पर्धकांसाठी आनंदाची, उत्साहाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी बँडमास्टर अभिक्ति कुंटे हे स्वतः विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि खास करून सर्व गटांतील विजेत्या, उपविजेत्या स्पर्पकांबरोबर एकाच वेळी बुद्धिबळापा सामना खेळणार आहेत. यामुळे अनेकांचे पेंडमास्टर बरोबर खेळण्याचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी पुढारी मुळे उपलब्ध होणार आहे.
आता आपण ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊ या...
पुण्यामध्ये अभिनव विद्यालय येथे शालेय शिक्षण घेतलेल्या अभिजीत कुंटे यांना वयाच्या आठव्या वर्षांपासून बुद्धिबळ या खेळाची आवड निर्माण झाली. याचे मुख्य श्रेय अभिजीत यांच्या मोठ्या बहिणीकडे जाते. प्रसिद्ध ग्रँडमास्टर फिडे किताब प्राप्त मृणालिनी कुंटे ही अभिजीत यांची मोठी बहीण. आपल्याला घरातच एवढा अनुभवी, हुशार मार्गदर्शक असताना अभिजीत यांचे बुद्धि चातुर्य आणखी चाले नसले तर नवलच.अतिशय तळमळीने या खेळा प्रति आपली आवड, निष्ठा, तळमळ जपली. बुद्धिबळ या खेळात आपल्या कौशल्याने, बुद्धिचातुर्याने जागतिक स्तरावर मोजक्या भारतीय खेळाडूंनी आपले माल गाजवले आहे.
त्यापैकी एक नाच म्हणजे पुण्याचे अभिजित कुंटे, सर्वप्रथम ग्रँडमास्टर किताब, आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्ध आणि मानाचा असणारा फिके किताब, राष्ट्रीय पुरस्कार यांच्यामुळे अभिजीत कुंटे सर्वदूर प्रसिद्ध आहेत.
त्याने भारतीय बुद्धिश्ट चम्पियनशिपमध्ये १९९७ व २००० दोन सुवर्णपदके १९९९, २००२,२००३,२००५ मध्ये चार कांस्यपदके जिंकली आहेत. त्याने एडिनबर्ग २००३ मध्ये ब्रिटीश बुद्धिक चैम्पियनशिप, आणि कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत दोन पदके जिंकली. अभिजित कुंटे यांनी १९९८ ते २००४ पर्यंत चार वेळा बुद्धिबळ ऑलीम्पियाडस मध्ये भारताये प्रतिनिधित्व केले आहे.
तसेच आशियाई संबंधिक व वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेत पदके जिंकली आहेत. त्याने कोलकाता (कलकता) १९९८, ब्लॅकपूल २००३, कोलकाता २००४, नवी दिल्ली २००५, गुएल्फ २००५, किचनर २००६ आणि मुंबई २००८ येथे पहिले किंवा सामायिक केले.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिषष्ठ खेकात अभिजीत कुंटे यांनी केलेल्या अतिशय उत्तम कामगिरीची दखल घेऊन २००० मध्ये त्यांना ग्रँडमास्टर किताब बहाल करण्यात आला. तरी आता या वैशिष्ट्यपूर्ण राईज अप सिझन ३ मधील महिलांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धत प्रमाणपत्रे, ट्रॉफी, रोख बक्षिसे मांची लयलूट करण्यासाठी प्रसिद्ध ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या बरोबर खेळण्यासाठी संधी आपल्याला उपलब्ध नाहे.
स्पर्धा शनिवार दिनांक ३ ० नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यात शिवशंकर सभागृह, स्वारगेटजवळ होणार असून या स्पर्धेसाठी नाव नोंदवण्मासाठी शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी मार्गदर्शक कोष व्यवस्थापक पालक यांच्या संपर्कातील मुली, विद्यार्थिनी महिला यांनी या स्पर्धेसाठी आपले नाव आजच नोंदवावे असे आवाहन पुढारी माध्यमसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
महाराष्ट्र चेस असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी श्री. राजेंद्र कोंडे९८२२३०३५४० फिडे पंच गुरुजित सिंग ७९७२३९३३७७ अतुल मगर ९८२२४४१९५३