घड्याळाच्या दुकानात काम ते आमदार; Baba Siddiqui यांचा असा होता बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंतचा प्रवास

1 hour ago 2

Baba Siddiqui Shot Dead : दसऱ्याला बाबा सिद्दीकी यांच्यावर रात्री गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडला मोठा धक्का बसला. वडिलांच्या घडाळ्याच्या दुकानात काम करण्यापासून ते आमदारकीपर्यंतचा त्यांचा असा होता प्रवास...

घड्याळाच्या दुकानात काम ते आमदार; Baba Siddiqui यांचा असा होता बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंतचा प्रवास

बाबा सिद्दीकी यांच्यावर कुणाचा प्रभाव?

| Updated on: Oct 13, 2024 | 8:54 AM

मुंबईतील वांद्रे परिसरात दसऱ्याच्या दिवशी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात ते गतप्राण झाले. लीलावती रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली. राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडला मोठा धक्का बसला. अनेक दिग्गजांनी तातडीने लीलावतीकडे धाव घेतली. वडिलांच्या घडाळ्याच्या दुकानात काम करण्यापासून ते आमदारकीपर्यंतचा त्यांचा असा होता प्रवास…

दिग्गजांची लीलावतीकडे धाव

बाबा सिद्दीकी यांचा राजकारणा इतकाच बॉलिवूडमध्ये प्रभाव होता. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या ग्रँड इफ्तार पार्टीकडे सर्वांचे लक्ष असायचे. या पार्टीत झाडून सर्व बॉलिवूड हजर असायचे. अनेक वर्षांपासून ही पार्टी दरवर्षी न चुकता होते. त्यात सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्तपासून बॉलिवूडमधील दिग्गज हजेरी लावतात. टीव्ही मालिकांमधील अनेक चेहरे या पार्टीत दिसतात. यंदा बाबांनी ही पार्टी मुंबईमधील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिली होती. त्यांच्यावर गोळीबार झाल्याची वार्ता पोहचताच राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत अनेकांनी लीलावतीकडे धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article