चांदीच्या पादुकांचा केला 3 नद्यांच्या जलाने अभिषेक:2 क्विंटल फुलांनी सजला गाभारा, अण्णा महाराजांचा उलगडला जीवनपट, भाविकांनीही व्यक्त केले अनुभव

5 hours ago 1
शहरात विविध ठिकाणी रेणुकामातेची स्थापना करणाऱ्या अण्णा महाराजांच्या १०७ व्या जयंती उत्सवाला साताऱ्यातील रेणुकामाता मंदिरात सुरुवात झाली आहे. गोदावरी, गंगा, नर्मदा या तीन प्रमुख नद्यांच्या जलाने चांदीच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला. २ क्विंटल फुलांनी गाभारा सजवण्यात आला होता. या वेळी महाराजांचा जीवनपट ऐकण्यासाठी अन् धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. स्वत:ला आलेल्या अनेक अनुभवांचेही भाविकांनी कथन केले. अण्णा महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षीपासून धार्मिक कार्यात रस घेऊन भारतभर प्रवास केला. या प्रवासात भगवतीचे महत्त्व त्यांनी ठिकठिकाणच्या भाविकांना पटवून दिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ३०० मंदिरांची स्थापना केली. दत्त मंदिर, गणपती मंदिर, माता मंदिर अशा विविध मंदिरांचे निर्माण त्यांनी केले आहे. अप्पा महाराजांच्या अधिपत्याखाली अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराजांनी या उत्सवाचे नियोजन केले. नवीन वर्षात नव्या रेणुका माता मंदिरात होईल उत्सव रेणुकामाता मंदिराच्या परिसरातच मागील २ वर्षांपासून नवीन मंदिराचे काम सुरू आहे. कर्नाटकी शैलीतील हे मंदिर वास्तुकलेचा नमुना ठरेल. येत्या काही महिन्यांतच मंदिरात नवीन मूर्तीची स्थापनाही होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या देवी मूर्तीचा तांदळा महाराजांच्या हस्ते बनवण्यात आलेला आहे. अर्धा किलो चांदीच्या पादुकांचा अभिषेक सकाळी काकडा आरतीनंतर पादुकांचा रुद्राभिषेक झाला. १३ जानेवारी १९९९ रोजी लाकडी पादुकांवर चांदीचे कव्हर बनवले . जवळपास अर्धा किलो चांदीचा वापर केला . गंगा, नर्मदा, गोदावरी या तीन नद्यांच्या पवित्र जलाने हा लघुरुद्राभिषेक करण्यात आला. या वेळी पुणे, बुलडाणा, अकोला, चिखली, परभणी, नांदेड येथून आलेल्या दोनशेहून अधिक भाविकांनी अभिषेकामध्ये सहभाग नोंदवला. सामूहिक कुंकुमार्चन केले. सायंकाळी डॉ. अनिकेत घोटणकर यांनी सद्गुरू योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज चरित्राचे निरूपण केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article