छ. संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी थोडक्यात बचावला

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Sep 2024, 7:50 pm

Updated on

30 Sep 2024, 7:50 pm

कन्नड : तालुक्यातील हतनूर शिवारातून मोटरसायकलवरून जात असणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सुदैवाने बचावले. ही घटना सोमवारी (दि ३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामुळे हतनूर शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी वर्गात भीती आहे.

हतनूर येथील शेतकरी चांगदेव कुकलारे हे आपल्या दुचाकीवरून शेतातून सायंकाळी सातच्या सुमारास हतनूर - तिसगाव रोडने घरी निघाले होते. यादरम्यान त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन बिबटे दिसून आले. यादरम्यान त्यांनी दुचाकीचा वेग वाढविला. त्यावेळी त्यातील एका बिबट्याने दुचाकीच्या दिशेने झडप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीचा वेग वाढल्याने ते थोडक्यात बचावले. तरीही भरधाव दुचाकीच्या पाठलाग करत हा बिबट्या ३०-३५ फूटापर्यंत त्यांच्या मागे धावत आला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article