देशातील पहिल्या क्रमांकाचे न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटचा श्रीगणेशा अगदी थोड्याच वेळात सुरू होत आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक स्टर्टगार्ट स्टेडियमवर दिग्गजांचा कुंभमेळा भरेल. या कार्यक्रमाला जर्मनतील पुढारी, कॉर्पोरेट जगातातील मंडळी, दिग्गज खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतील. भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध अधिक मजबूत आणि दृढ करण्यासाठी हे समिट मोठे पाऊल मानण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्लोबल समिटीचे प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जागतिक मंचावरून देशाला आणि विश्वाला काय संदेश देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तीन दिवसांचे ग्लोबल समिट
21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असे तीन दिवस जर्मनीत विविध विषयावर आणि मुद्यांवर देवाण-घेवाण होईल. शाश्वत विकास, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर दोन्ही देशात विचार मंथन होईल. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कॅबिनेट मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित असतील. V9 च्या News9 ग्लोबल समिटमध्ये अनेक विचारवंत त्यांचे विचार मांडतील. या कार्यक्रमात जवळपास 50 वक्ते त्यांचे नजरेतून जर्मनी आणि भारतावर नव्याने प्रकाश टाकतील. या दोन्ही देशातील सर्वच क्षेत्रातील तुलनात्मक विचार मांडतील आणि दोन्ही देशांनी एकत्र येण्यासंबंधी आणि दृढ संबंध वाढवण्यावर भर देतील.
हे सुद्धा वाचा
या कार्यक्रमात पोर्शे, मारुती, सुझुकी, मर्सिडीज बेंज, भारत फोर्स, तर इतर अनेक दिग्गज कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित असतील. याशिवाय या कार्यक्रमात अनेक दिग्गज उपस्थित राहतील आणि पुरस्कार वितरण होईल, असे TV9 नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बरूण दास यांनी सांगीतले.
पंतप्रधानांच्या संदेशाकडे सर्वांचे लक्ष
ग्लोबल समिटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या जागतिक मंचावरून देशाला आणि विश्वाला संबोधित करतील. भारतीय अर्थव्यवस्थाने झपाट्याने दहाव्या क्रमांकावरून 5 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भारत तिसऱ्या स्थानाकडे झपाट्याने पुढे जात आहे. India : Inside the Global Bright Spot या विषयावर पंतप्रधान विचार मांडतील. 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता ते मनोगत व्यक्त करतील.