North Maharashtra Election Results 2024Pudhari News network
Published on
:
26 Nov 2024, 9:27 am
Updated on
:
26 Nov 2024, 9:27 am
उत्तर महाराष्ट्रातही अनेक नवनिर्वाचित आमदारांनी विजयपथावर मार्गस्थ होताना घराणेशाहीची झूल खांद्यावर टाकल्याचे सिद्ध झाले आहे.
नाशिक पूर्वचे भाजप आमदार राहुल ढिकले यांना घराण्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांचे वडील उत्तमराव ढिकले हे नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार अशा विविध पदांवर कार्यरत राहिलेत. नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे या विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते ना. स. फरांदे यांच्या चुलत स्नुषा तर नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे या ज्येष्ठ भाजप नेते पोपटराव हिरे यांच्या स्नुषा आहेत. भाजपचे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे वडील डॉ. दौलतराव आहेर हे खासदार, आमदार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राहिले आहेत. देवळालीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे यांचे वडील बाबुलाल आहिरे यांनी काँग्रेसकडून आमदारकी भूषवली आहे. कळवणमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पवार यांचे वडील ए. टी. पवार आठ वेळा आमदार आणि दोनदा मंत्री राहिले आहेत.