टपाली मतदानPudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 6:31 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:31 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान कक्ष लावण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड अशा 329 जणांनी आपले मतदान केले.
भुसावळ विधानसभा मतदार संघात गुरुवार (दि.14) रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान कक्ष लावण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. 164 पैकी 135 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान केले. 206 पैकी 194 होमगार्ड कर्मचारी यांनी मतदान केले. अत्यावश्यक सेवेतील 4 पैकी 4 मतदान झाले. असे एकूण 370 पैकी 329 कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. नायब तहसीलदार डॉ. अंगद आसटकर हे यावेळी उपस्थित होते.