जागावाटपावरून महायुतीमध्ये तणाव:पिंपरी-चिंचवडची जागा आपल्याकडे घेऊ, अजित पवारांनी दिले आश्वासन

3 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात जाऊन लाडक्या बहीणींशी ते संवाद साधत आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवडची जागा सध्या भाजपकडे आहे. मात्र चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी चिंचवडमधील नेत्यांना दिली आहे. महायुतीमधील पिंपरी चिंचवडची जागा भाजपकडे आहे. तसेच जिथे जो आमदार तिथली जागा त्या पक्षाला देण्याचा फॉर्म्युला महायुतीचा ठरला आहे. भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या येथील आमदार झाल्या आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा असून अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची मागणी अजित पवारांकडे केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्वीपासूनच वर्चस्व आहे. तसेच चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही जागा आपल्याला न मिळाल्यास बंडखोरी करू, असा इशारा देखील दिला होता. याच पार्श्वभूमीवर बारामती येथे संवाद साधत असताना ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे घेऊ, असे थेट अजित पवारांनी आश्वासनच दिले आहे. मात्र, असे करणे महायुतीच्या धोरणाच्या विरोधात होईल. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला ती जागा, असे महायुतीच्या धोरणानुसार चिंचवडची जागा भाजपलाच मिळणार. याच कारणामुळे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी थेट महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article