‘जायकवाडी’तून विसर्ग घटताच रोज २०० ब्रास वाळूची वाहतूक:वाहतुकीमुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाला धोका‎

2 hours ago 2
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होताच वाळू तस्कर पुन्हा नदीपात्रात सक्रिय झाले आहेत. रोज रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत दहा ते पंधरा हायवा व इतर वाहनांद्वारे जवळपास २०० ब्रास वाळूची अवैध वाहतूक गोदावरी नदीच्या पात्रातून केली जोते. विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या मुख्य २७ गेट्ससमोर असलेल्या अरुंद पुलावरून वाळूची वाहने जात असल्याने ‘जायकवाडी’च्या पायथ्याशी असलेल्या या पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने अनेक वेळा महसूल विभागाला कळूनदेखील कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. धरणातून मागील पंधरा दिवसांपासून मुख्य गेट्समधून पाणी नदीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. आता गेट्स बंद केल्याने चार दिवसांपासून वाळू तस्कर पुन्हा नदीपात्रात सक्रिय झाले आहेत. कावसान, पाटेगाव, नवगाव, तुळजापूर, जुने कावसन, दादेगाव या ठिकाणाहून रात्रभर बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असून महसूलचे वाळूविरोधी पथक गायब झाल्याचे दिसून येत आहे. धरण परिसरातून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी अभियंता विजय काकडे यांनी केली आहे. रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत दहा ते पंधरा हायवांतून वाहतूक‎ जायकवाडी धरणातून विसर्ग कमी होताच पुन्हा वाळू तस्कर सक्रिय झाले आहेत. गोदापात्रातून वाळूचा उपसा करून रात्री धरणाच्या‎पायथ्याशी असलेल्या अरुंद पुलावरून वाळूची वाहतूक वाहनांतून केली जाते.‎ दिव्य मराठी थेट सवाल विशेष लक्ष देऊन कारवाई करू- संजय देशमुख, पोलिस निरीक्षक Q. अवैध वाळूची वाहतूक कशी रोखणार? A. अवैध वाळूची वाहतूक होत असेल तर पाहणी करून कडक कारवाई करण्यात येईल. Q. पुलावरून वाळूची वाहतूक होत असल्यास काय कारवाई करणार? A. यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावरून अवैध वाळूची वाहतूक करताना कुणी आढळून आल्यास वाहने जप्त करून कारवाई केली जाईल. Q. रात्रीची वाळू वाहतूक रोखण्यासाठी काय करणार? A. कारवाईसाठी रात्रीची मोहीम राबवली जाईल. शिवाय महसूल विभागानेही कारवाईवर लक्ष देणे गरजेचे आहे.रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत दहा ते पंधरा हायवांतून वाहतूक

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article