टपाली मतपत्रिका वितरीत १० हजार:प्रत्यक्ष मतदान झाले अवघे ६ हजारच; यादीतून अनेकांची नावे गहाळ, मतपत्रिका मिळाल्या नसल्याच्या तक्रारी
3 days ago
2
विधानसभा निवडणुकीत कर्तव्यावर १० हजार ७०६ अधिकारी-कर्मचारी राहणार आहेत. त्यांना सध्या १० हजार २०२ टपाली मतपत्रिका वितरीत करण्यात आल्या असून, ६ हजार ११ जणांना मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती सोमवारी प्रशासनाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र, टपाली मतदानासाठी ईडीसी फॉर्म भरूनही यादीतून अनेकांची नावे गहाळ असल्याचे वंचितच्या नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना पाेस्टल बॅलेट मिळाले नसल्याने ते मतदानाच्याअधिकारापासून वंचित राहू शकतात, असेमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचेजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातकेली आहे. टपाली मतदान प्रक्रिया मंगळवारीहीहाेणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.मतदान कर्तव्यावर एकूण १० हजार ७०६कर्मचारी अाहेत. यात असणारे ८ हजार ४३६मतदान कर्मचारी, २ हजार २७० पोलिस,होमगार्ड कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनाटपाली मतदान करणे शक्य व्हावे, यासाठीनमुना १२ वितरित करण्यात आला होता. सर्वनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावरमतदान सुविधा केंद्रात या सर्व मतदानकर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचे मतदाननोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काय आहे पत्रात? निवडणूक कर्तव्यावरअसलेल्या कर्मचाऱ्यांना पाेस्टल बॅलेट उपलब्धन झाल्याबाबत महाराष्ट राज्य जुनी पेन्शनसंघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.लाेकसभा निवडणुकीतही कर्तव्यावरअसलेल्या काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनामतदानापासून वंचित राहावे लागले हाेते. आताविधानसभा निवडणुकीतही बऱ्याचकर्मचाऱ्यांना पाेस्टल बॅलेट उपलब्ध झालेलेनाही. त्यामुळे त्यांना पाेस्टल बॅलेट उपलब्धकरून द्यावे, असेही पत्रात नमूद केले आहे. सुविधा केंद्र सुरू; आज राहणार कार्यान्वित आतापर्यंत सुविधा केंद्रांवर ६ हजार ११ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील सुविधा केंद्रात जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. हे सुविधा केंद्र १९ नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)