अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामना पार पडले. पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला, तर दुसऱ्या सामन्या भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला.टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना पाहण्याची मेजवानी क्रीडारसिकांना मिळणार आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना धाकधूक वाढवणार होता. पण सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर हेन्रिक क्लासेनचा झेल पकडला आणि सामना भारताच्या पारड्यात झुकला. हा प्रसंग अजूनही क्रीडारसिकांच्या मनात राज्य करून आहे. असं असताना पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण अफ्रिका सामन्याची मेजवानी क्रीडारसिकांना मिळणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना दक्षिण अफ्रिकेने 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला 105 धावांवर रोखलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 5 गडी गमवून 18.1 षटकात पूर्ण केलं. दुसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड भिडले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने फलंदाजी घेतली. इंगिलंडने भारतासमोर विजयासाठी 113 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 15 षटकात फक्त एक गडी गमवून पूर्ण केलं. तसं पाहिलं तर भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण बाजी मारते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.
इंग्लंड महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): डेविना सारा टी पेरिन, जेमिमा स्पेन्स, ट्रूडी जॉन्सन, अबी नॉर्ग्रोव्ह (कर्णधार ), शार्लोट स्टब्स, केटी जोन्स (विकेटकीपर), प्रिशा थानावाला, टिली कॉर्टीन-कोलमन, फोबी ब्रेट, शार्लोट लॅम्बर्ट, अमू सुरेनकुमार.