नेवासा व श्रीगोंदा मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’ची पडताळणी 21 फेब्रुवारीपासून

2 hours ago 1

प्रतिनिधिक छायाचित्र File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 12:04 pm

Updated on

31 Jan 2025, 12:04 pm

नगर : भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी आणि पडताळणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीगोंदा या दोन विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएमचा समावेश आहे. ही पडताळणी 21 ते 24 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी सुरु आहे. दरम्यान तपासणी व पडताळणी प्रक्रियेतून माघार घेण्यासाठी उमेदवारांना 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थितीत करून ईव्हीएम तपासणी आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी शुल्कासह अर्ज दाखल केले होते. यामध्ये लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे, विधानसभेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राणी लंके, राहुल जगताप, प्रभावती घोगरे, संदीप वर्पे, प्राजक्त तनपुरे व अभिषेक कळमकर या दहा उमेदवारांचा समावेश आहे.

यापैकी बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रभावती घोगरे, संदीप वर्पे व अभिषेक कळमकर यांनी तपासणी व पडताळणी प्रक्रियेतून माघार घेतली तर डॉ. विखे यांच्यासह विधानसभेचे उमेदवार प्रा. शिंदे, गडाख, जगताप, ढाकणे व लंके यांचे अर्ज पडताळणीसाठी शिल्लक आहेत.

दरम्यान, डॉ. विखे, प्रा.शिंदे, ढाकणे व राणी लंके यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. उर्वरित नेवासा मतदारसंघाचे उमेदवार शंकरराव गडाख व श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार राहुल जगताप यांचे अर्ज शिल्लक आहेत. न्यायालयात धाव घेतलेल्या उमेदवारांनी मागणी केलेल्या ईव्हीएमची तपासणी न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. मात्र, अद्याप या तीन उमेदवारांबाबत न्यायालयाचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे दि.21 व 24 फेब्रुवारी दरम्यान फक्त नेवासा व श्रीगोंदा या दोन मतदारसंघांतील ईव्हीएम तपासणी आणि व्हीव्हीपॅट पडताळणी होणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे अभियंता येणार

निवडणूक आयोगाने ईव्हीएम तपासणीबाबत आदेश जारी केले आहेत. देशभरात 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश बंगळूरु येथील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीला दिले आहेत. त्यानुसार कंपनीच्या वतीने चार अभियंता नियुक्त केले आहेत. यांच्यावर देखरेखीसाठी एक पर्यवेक्षक असणार आहेत. बारा टेबलवर चार सेटमध्ये ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article