ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात:दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील, उदय सामंत यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
3 hours ago
1
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरेंचे काही आमदार आमच्यासंपर्कात् आहेत. त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे घेतील. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप आता समोरून केला जातोय. जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलोय. गद्दारी कोणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिले. कोकणाचा विकास करू उदय सामंत म्हणाले की, महायुतीचे कोकणमध्ये निवडून आलेले आमदार कोकणचा विकास करू याचा आम्हाला विश्वास आहे. तिथे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणारच होती हे मला माहित होते, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. साामंत म्हणाले की. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेली विकासकामं जनतेने पाहिली आहेत. त्यामुळे जनतेचा कौल महायुतीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली. महायुतीची पकड मजबूत नारायण राणे यांचे दोन्ही सुपूत्र आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोकणामध्ये घराण्यांची परंपरा मोठी राजकीय आहे. राणे, तटकरे आणि सामंत यांच्या विजयांच्या रूपाने आता ती अधिकच ठळक होण्यास मदत आहे. सर्वच ठिकाणी यंदा पैशाच्या वारेमाप वापराचा मुद्दा कळीचा राहिला. त्याचा लाभ बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना झाल्याचे पाहायला मिळते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)