ठाकूरांचा विरारमध्ये राडा सुरू असताना डहाणूत बविआ उमेदवार भाजपत दाखल:तावडेंच्या डायरीतील सांकेतिक शब्दांचा ठाकूर यांनी केला उलगडा
1 day ago
2
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, आमदार हितेंेद्र ठाकूर आणि त्यांचे समर्थक मंगळवारी सकाळी नोटा वाटप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडेंविरुद्ध विरार येथे आंदोलन करत होते. त्याच वेळी डहाणू मतदारसंघातील त्यांच्याबहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी भाजपत दाखल झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिला. सुरेश पाडवी यांनी गेल्या विधानसभेत २०१९ मध्ये अपक्ष लढून ९ हजार मते घेतली होती. यंदा त्यांना डहाणूमध्ये बविआने उमेदवारी दिली. मात्र हितेंद्र ठाकूर साधा फोनही उचलत नसल्याचा आरोप पाडवी यांनी केला आहे. शिवाय, प्रचारात २४ लाख खर्चूनही पक्षाकडून कोणतीही मदत केली जात नाही. म्हणून पक्षांतर केल्याचे पाडवींचे म्हणणे आहे. राड्यानंतर एकाच गाडीतून गेले हितेंद्र ठाकूर, तावडे नालासोपारा मतदारसंघातील विरारच्या हॉटेलात विनोद तावडे पैसे वाटप असल्याच्या आरोपावरुन सुमारे तीन ते चार तास राडा झाल्यानंतर विनोद तावडे व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद झाली. तिथे ठाकूर यांनी आधी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करुन नंतर पैशाचे आरोप केले. तर तावडे यांनी आरोप नाकारले. आमदार क्षितिज ठाकूर पैशासंदर्भात बाेलत असताना पोलिसांनी नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पत्रकार परिषद बंद करायला लावली. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. लगेच ठाकूर व तावडे हॉटेलच्या बाहेर पडले. मात्र नंतर एकाच गाडीतून गेले. ‘आम्ही जेवायला चाललोत’ असे तावडे म्हणाले. तर ‘तावडे उरलेले पैसे आता मला देतील’, असे ठाकूर गमतीने म्हणाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र बविआ कार्यकर्ते आक्रमक झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तावडेंना ठाकूर यांच्या गाडीतून पाठवल्याचे नंतर सांगण्यात आले. पुढे दोघे दोन वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. हितेंद्र ठाकूर मात्र आरोपावर ठाम होते. तावडेंनी 25 फोन केले.. मला माफ करा- हितेंद्र ठाकूर बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलात घेरल्यानंतर तावडे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना फोन केले. ‘चूक झाली, जाऊ द्या असे म्हणत त्यांनी मला २५ फोन केले,’ असे ठाकूर यांनीच माध्यमांना सांगितले. मात्र नंतर ठाकूर यांनी हॉटेलात येऊन ‘हे पैसे आले कुठून?’ त्यांना जाब विचारला. तावडे यांच्याकडे सापडलेल्या डायऱ्यांमध्ये नावे असून त्यापुढे ‘300 K’ असे लिहिले आहे. ‘K’ म्हणजे हजार अशा रकमेचे वाटप झाल्याचे ठाकूर म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)