ठाणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे स्वागत; डोंबिवलीत मनसेचा जल्लोष

2 hours ago 1

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा.Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

07 Oct 2024, 10:31 am

Updated on

07 Oct 2024, 10:31 am

कल्याण : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात साखर वाटून तमाम डोंबिवलीकर नागरिक बांधवाचे तोंड गोड करून पेढे वाटून फटाक्याच्या आतषबाजी व घोषणा बाजी करीत जल्लोष साजरा केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी गेली बारा वर्ष मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करीत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेरीस यश आले असून केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केल्याने मराठी भाषेचा गौरव झाला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवलीतील मनसेच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात नागरिकांना सारखर व पेढे वाटून तोंड गोड केले. विधान सभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, महिला शहर अध्यक्षा मंदा ताई पाटील, शहराध्यक्ष राहुल कामत उप शहर अध्यक्ष श्रीकांत वरांगे, राजू पाटील आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले की, गेली एक तपाहून अधिक काळ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या मागणी करिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या वतीने मागणी करीत होते. त्यांच्या मागणीला यश आले असल्याने मराठी माणसाचे अखेरीस स्वप्न पूर्ण झाले. मराठी भाषा आता समुद्रापलीकडे पोहाचली असताना आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने हा सोनियाचा दिवस असल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article