ठाकरे गटाचा शरद पवारांना धक्का!:सुषमा अंधारेंनी हडपसरवर दावा सांगत थेट उमेदवारच केला जाहीर

1 hour ago 1
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी देखील त्यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाला धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुंबईमध्ये मॅरथॉन बैठकांचे आयोजन करणे सुरू आहे. तसेच ज्या मतदारसंघात जो आमदार त्याच पक्षाला ती जागा सोडली जाणार, असे एकंदरीत उमेदवारी देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागेसाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरू असतानाच ठाकरे गटाने या जागेवर दावा केल्याने पवारांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे यांनी हडपसर हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील, अशी थेट घोषणा त्यांनी केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही, सगळ्याच जागांवर एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून आता केवळ 15 ते 18 जागांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाने देखील पुण्यातील हडपसर, पर्वती, वडगाव शेरी आणि खडकवासला या जागांवर दावा केला आहे. तर ठाकरे गटाने देखील हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड, खडकवासला या जागा आपल्याला मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचे दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article