अकोल्यात क्षुल्लक कारणावरुन दोन गटात राडा:रस्त्यावरच वाहने पेटवली, दगडफेकीत काही जण जखमी

2 hours ago 2
अकोला शहरात क्षुल्लक कारणावरुन दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. शहरातील हरिहर पेठ भागात ही घटना घडली. क्षुल्लक वादाचे रुपांतर मोठ्या वादात होऊन अकोला शहरात जाळपोळ आणि दगडफेक यावेळी रिक्षा आणि दुचाकी पेटवून देण्यात आल्या. तसेच दगडफेक देखील झाली आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात झालेल्या या राड्यामुळे हरिहर पेठ भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणाचे रुपांतर मोठ्या दंगलीत होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अकोला शहरातील हरिहर पेठ भागात रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली. यानंतर रिक्षा चालक आणि दुचाकी चालकामध्ये किरकोळ वाद झाला. मात्र या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात होऊन दोन गट समोरासमोर उभे ठाकले. या वादातूनच घटनास्थळावर वाहने पेटवून देण्यात आली. यामध्ये एक रिक्षा आणि तीन गाड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अकोला शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी जमावाला पांगवले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ही घटना पोलिसांचे अपयश अकोल्यातील दगडफेक आणि जाळपोळीची ही घटना अकोला पोलिसांचे अपयश आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असून या संदर्भात गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहोत, असे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. हेही वाचा... राज्यातील धनगड जातीचे 6 दाखले रद्द:धनगर आरक्षणाचा मोठा अडथळा दूर, काय आहे प्रकरण? राज्यातील महायुती सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेत धनगड असा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे आता धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबातील 6 सदस्यांनी धनगड जातीचे दाखले काढले होते. मात्र हे दाखले राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article