आज समाजात सुशिक्षित निरक्षरांचे प्रमाण अधिक:डॉ. मोहन आगाशे यांचे प्रतिपादन

1 hour ago 1
तुम्ही तुमच्या आयुष्यात दोन व्यवसाय करायला पाहिजेत. एक जो तुम्हाला जगवेल आणि दुसरा जो तुमची किंमत ठेवेल. तुमची क्षमता हीच तुम्हाला आयुष्यात टिकून राहण्यास मदत करते. तुमची क्षमता काय आहे याची ओळख करून देणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश असायला हवा, असे विधान डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ यांनी केले. सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे "साहित्य महोत्सव २०२४" चे आयोजन सिंबायोसिस ईशान्य भवन, विमान नगर येथे करण्यात आले होते. या वर्षीच्या महोत्सवाची थीम 'एक जग, अनेक कथा' यावर आधारित होती. या महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी डॉ. मोहन आगाशे, यांना आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेते सुधन्वा देशपांडे यांनी डॉ. आगाशे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॉ.आगाशे म्हणाले, शिक्षित होणे आणि साक्षर होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आज आपल्या समाजात सुशिक्षित निरक्षरांचे प्रमाण जास्त आढळते. जर तुम्हाला साक्षर व्हायचे असेल तर आयुष्यात किमान एकातरी कलेशी जरूर मैत्री करा.नाटक आणि चित्रपटांमधील त्यांच्या कामगिरीबद्दल बोलताना त्यांनी नमूद केले की, जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता समर्पित करावी लागते आणि सर्व काही हे तुमच्या कामगिरीवर केंद्रित करावे लागते. तरुणांना संबोधित करताना ते म्हणाले, आजच्या तरुणांना आपल्या भावना नेमक्या काय आणि कशा आहेत, याची जाणीवही नाही. त्यांच्याकडे अनेक प्रकारची माहिती विपुल प्रमाणात आहे परंतु अनुभवाची कमतरता आहे. खरेतर हे विरुद्ध असायला हवे, तुम्हाला तुमच्या जीवनातील अनुभव हा उपलब्ध माहितीशी जोडता आला पाहिजे. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये पाठ्यपुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी दृकश्राव्य अनुभवही द्यायला हवा."घाशीराम कोतवाल" या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले, घाशीराम वादग्रस्त असल्यामुळे नव्हे तर त्याच्या वैश्विक स्वरूपामुळे लोकप्रिय झाला. घाशीराम ही विजय तेंडुलकरांची कालातीत अशी निर्मिती आहे. हे नाटक अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले. त्याच्या सार्वत्रिकतेमुळे त्याला जगात लोकप्रियता मिळाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article