विधानसभा निवडणुकांचा परिणाम:राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

2 hours ago 1
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आता थेट 31 डिसेंबरच्या नंतर होणार असल्याची माहिती समोर अली आहे. 29 हजार 429 निवडणुका प्रलंबित राज्यात 29 हजार 429 निवडणुका गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असून त्या सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. आता तर विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे आता देखील या प्रलंबित निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सहकार क्षेत्राच्या निवडणुकांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील जवळपास 7,109 सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या. यात दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांच्या निवडणुकांचा समावेश होता. तसेच नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात पावसाची परिस्थिती विचारात घेत शासनाने 20 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्या पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 73 कब मधील तरतुदी नुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या कार्यालयाकडून 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्राव्दारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सन 2024-25 या वर्षात राज्यातील 29,429 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुकी घेण्यास अडचणी येऊ शकतात. या बाबीचा विचार लक्षात घेत सहकर संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article