चंद्रकांत पाटलांविरोधात पक्षातूनच बंडखोरीचे संकेत:माजी नगरसेवक अमोल बालवडकर विधानसभेसाठी कोथरुडमधून इच्छुक

2 hours ago 1
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरवरुन पुण्यातील कोथरुड मतदारसंघात येत तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी व इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक भाजप कार्यर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. परंतु, त्यानंतर कुलकर्णी व मोहोळ यांना खासदारकीची लॉटरी लागल्याने यंदाची विधानसभा निवडणूक चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुकर होईल अशी चिन्ह होती. मात्र, आता भाजपचे बाणेरमधील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत पक्षाने उमेदवारी न दिल्यास जनतेकरिता मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला आहे. बालवडकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारी मागण्यात कोणतीही चूक नसल्याचे मत प्रदर्शित करत बाणेरमध्ये जनआशिर्वाद मेळावा घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत पाटील यांच्यासमोर तडगे आव्हान निर्माण करणार असल्याचे संकेत दिले आहे. भाजपमधील काही नेत्यांकडून बहिष्कृतपणाची वागणूक बालवडकर म्हणाले, मी विधानसभेसाठी इच्छुक झाल्याने मला आमच्या पक्षातील काही नेत्यांनी बहिष्कृतपणाची वागणूक देणे सुरु केले आहे. माझ्या कार्यक्रमासाठी कोणते नेते किंवा पदाधिकारी येऊ दिले जात नाही. तसेच कोणी येण्यासाठी तयारीत असेल तर त्यांना थांबविण्यात येते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने उमेदवारीची मागणी करणे यात गैर काही नाही. पण त्याची धास्ती वरिष्ठ नेते घेत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत विचार करावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी लोकांना भेटण्यासाठी जात असताना, त्यांनी मागणी केली की, आपल्याला विकासासाठी पुढे गेले पाहिजे. नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पूर्णवेळ आमदार आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक मी करु शकतो असे नागरिकांना वाटत आहे. पक्षाच्या कामाकरिता मागील दहा वर्ष मी सर्वातपरी प्रयत्न करत असून नेत्यांच्या कामासाठी झटत असताना कोणती आकस माझ्याबाबत नव्हती. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केल्यावर माझ्याबद्दल पक्षात आकस वाढला आहे. मला पक्षातून काढून टाकण्याची देखील धमकी दिली जात आहे. अजूनही वेळ गेलेली नसून पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत विचार करावा, असे बालवडकर म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article