डिसेंबरपर्यंत अवकाळी बरसणार ; मान्सून 6 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला

2 hours ago 1

यंदा मान्सून राज्यातून दरवर्षीच्या तुलनेत लवकर माघारी परतणार आहे. मात्र, त्यापाठोपाठ अवकाळी पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम थेट डिसेंबरपर्यंत राहणार असून, 115 टक्के बरसण्याचा अंदाज आहे. हा अवकाळी पाऊस ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याचे कारण ला-निना तटस्थ अवस्थेतून सक्रिय अवस्थेकडे जात आहे.

दरवर्षी मान्सून राज्यातूून साधारणपणे 5 किंवा 6 ऑक्टोबरला निघतो. तो 15 ते 18 ऑक्टोबरपर्यंत बरसून मग पुढे दक्षिण भारतात जातो. त्यानंतर पावसाचा मोठा खंड असतो. नोव्हेंबरमध्ये दिवाळीत बहुतांशवेळा हलक्या सरी पडतात. मात्र, हा पाऊस साधारण 30 ते 50 मिमी इतका असतो. मात्र, यंदा मान्सून परतल्यावर लगेच अवकाळी पाऊस सुरू होत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 115 टक्के पाऊस

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article