डॉ. विद्या येरवडेकर यांना ऑस्ट्रेलियाच्या डीकिन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान:उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव

2 days ago 1
ऑस्ट्रेलियाच्या डीकिन विद्यपाठाने डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस च्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणातील कार्याची दखल घेऊन मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. नवी दिल्ली येथे डीकिन विद्यापीठाने भारतासोबतच्या ३० वर्षांच्या यशस्वी भागादीरीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डीकिन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया हे जागतिक विद्यापीठांच्या शीर्ष १ टक्के मध्ये स्थान मिळवलेले आणि भारतातील आंतरराष्ट्रीय शिक्षणात अग्रगण्य, उच्च शिक्षण, संशोधन आणि नवकल्पना आणि कौशल्य विकासामध्ये परिवर्तनशील सहभागाची ३० वर्षे साजरी करत आहे. या कार्यक्रमात जॉन स्टॅनहॉप एएम, कुलपती, डीकिन विद्यापीठ यांनी डॉ. विद्या येरवडेकर यांचा त्यांनी उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात दिलेल्या योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, अशासकीय सदस्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न पुणे - कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम (प्रतिबंध मनाई व निवारण) २०१३ व त्याची व्याप्ती या विषयावर स्थानिक समितीमधील अशासकीय सदस्यांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण महिला व बालविकास विभागामार्फत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच संपन्न झाले. यावेळी महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेचे उप आयुक्त दत्तात्रय मुंडे, उपायुक्त सुवर्णा पवार, ॲड. शारदा वाडेकर, भाग्यश्री वाठारे उपस्थित होते. प्रशिक्षणात कायद्यापुढील तरतुदींची आव्हाने सांगून वाठारे म्हणाल्या, महिलांचा लैंगिक छळ अधिनियम (प्रतिबंध मनाई व निवारण) २०१३ हा कायदा स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी सन्मानाने व सुरक्षिततेच्या वातावरणात काम करण्याची हमी देणारा कायदा आहे. तसेच संविधानाने दिलेल्या कलम १४,१५,१९ व २१ या मूलभूत हक्कांची जपवणूक करणारा कायदा आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यातील स्थानिक समित्या व अंतर्गत समितीतील अशासकीय सदस्य व पदाधिकाऱ्यांची आहे.शारदा वाडेकर यांनी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी व पिडीत व्यक्तीस कसा न्याय मिळवून द्यायचा याबाबत मार्गदर्शन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article