तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार:सोशल मीडियावर बदनामी केल्याने तरुणावर गुन्हा दाखल

3 days ago 2
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या एका तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तिची बदनामी केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी कोथरुड भागात राहण्यास आहे. आरोपी तरुणीचा मित्र असून तरुणीने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडले होते. यामुळे आरोपी तिच्यावर चिडलेला होता. त्याने तरुणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट नावाने खाते उघडले. सोशल मीडिया खात्यावर तरुणी आणि तिच्या आईच्या नावे बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. त्याने अश्लील छायााचित्रे परस्पर प्रसारित केली. हा प्रकार पीडित.तरुणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीनेे याबाबतपोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम पुढील तपास करत आहेत. जुगार अड्ड्यावर छापा १६ जणांविरुद्ध गुन्हा कात्रज परिसरात जुगार अड्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (आंबेगाव) छापा टाकला. पोलिसांनी याप्रकरणी जुगार अड्ड्याचा चालकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोबाइल संच, जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड असा एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी जुगार अड्ड्याचा चालक किशोर सातपुते (रा. दांडेकर पूल), साहिल इब्राहिम साठी (रा. धनकवडी), किरण डिंबळे, रोहिदास गोरड (दोघे रा. पर्वती), हर्षद थोरवे (रा. शुक्रवार पेठ), गणपत सुतार (रा. नऱ्हे), दत्ता जोगी, विराज पाटील, मुन्नवर शेख, इम्रान दलाल (चौघे रा. कात्रज), वसंत वाध (रा. शिवणे), योगेश घुमक (रा. सिंहगड रस्ता), धमेंद्र सिंग (रा. हडपसर), दत्ता सितप (रा. नऱ्हे), राजेश उत्तेकर, लक्ष्मण मानकर (दोघे रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई बालाजी पांचाळ यांनी भारती विद्यापीठ (आंबेगाव) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात जांभुळवाडी भागात एका इमारतीत किशोर सातपुते, साहिल साठी जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून पत्ते, १६ मोबाइल, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. मुंबई जुगार अधिनियमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article