ती संस्था माझ्या एकट्याची नाही, ते एक देवस्थान:कोराडी येथील संस्थेला मिळालेल्या भूखंडावर चंद्रशेखर बावणकुळे यांचे स्पष्टीकरण

2 hours ago 1
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला महायुतीने शासकीय भूखंड किरकोळ दरात दिला आहे. या पाच एकर भूखंडावर संस्था तंत्रशिक्षण आणि नर्सिंग कॉलेज उभारणार आहे. रेडिरेकनरनुसार या भूखंडची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा भूखंड किरकोळ दरात दिल्याने विरोधकांकडून चंद्रशेखर बावणकुळे आणि महायुतीवर टीकेची झोड उठली आहे. आया या मुद्द्यावर बावणकुळे यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बावणकुळे म्हणाले की, कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान एक धार्मिक आणि सामाजिक संस्थान आहे. मागे एकदा मी पण त्या संस्थानाचा अध्यक्ष होतो. पण ते माझ्या एकट्याचे संस्थान नाही. कोराडी येथील जगदंबा संस्थान नागपूर जिल्ह्यासह राज्यातील मोठे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे विरोधकांनी विचार करून टीका करावी. तसेच टीका करताना राजकारणाचा स्तर राखावा, असे बावणकुळे म्हणाले. विरोधकांनी कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करू नये पुढे बोलताना बावणकुळे म्हणाले की, या भूखंड प्रकरणात महालक्ष्मी संस्थानला 1 कोटी 48 लाख रुपये भरायचे आहेत. या संस्थानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ 1 रुपयांत शिक्षण मिळते. त्यामुळे देवाच्या देवस्थानवरून तरी विरोधकांनी राजकारण करू नये, अशी टीका बावणकुळे यांनी केली आहे. भूखंड देण्यास अर्थ आणि वित्त विभागाचा विरोध दरम्यान कोराडी येथील संस्थेला भूखंड देण्यास अर्थ आणि महसूल खात्याचा विरोध होता. या संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे तपशिलात दिसून आले नाही. त्यामुळे या संस्थेला जमिनीच्या दरात सूट देऊ नये, असे वित्त विभागाकडून म्हटले होते. हे ही वाचा... बावनकुळेंच्या संस्थेला अत्यल्प दरात शासकीय भूखंड:जमीन लुटारु सरकार म्हणत विरोधकांचा हल्ला; राऊत, वडेट्टीवारांचा निशाणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महसूल खात्याचा देखील विरोध होता. असे असताना देखील बावनकुळे यांच्याशी संबंधित असलेल्या महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी या संस्थेला तंत्र शिक्षण आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी हा पाच हेक्टरचा भूखंड अत्यल्प दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article