दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांचे निधन:नक्षल समर्थक असल्याचा होता आरोप

5 days ago 2
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि नक्षल समर्थक असल्याचा आरोप असलेले जी. एन. साईबाबा (वय ५७) यांचे शनिवारी हैद्राबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साईबाबांना पित्ताशयाचा संसर्ग आणि इतर आरोग्यविषयक समस्या होत्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०२४ मध्ये निर्दोष मुक्तता केली आहे. मंगळवार ५ मार्च २०२४ रोजी हा महत्वपूर्ण निकाल नागपूर खंडपीठाने दिला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने या खटल्यातील अन्य पाच आरोपींनाही दोषमुक्त केले. ५७ वर्षीय साईबाबाला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षाही न्यायालयाने रद्द केली आहे. मार्च २०१७ मध्ये, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने साईबाबा आणि पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (विद्यार्थ्यासह इतर पाच जणांना कथित माओवादी संबंध आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या कृत्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले होते. यापूर्वी १५ आॅक्टोबर २०२२ रोजी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना कार्यमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यामुळे साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील आदेशापर्यत तुरूंगात राहावे लागले. आरोपींविरुद्धचा खटला वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले आहे, असे हायकोर्टाने म्हटले होते. यूएपीएच्या तरतुदींखाली आरोपींवर आरोप ठेवण्यासाठी फिर्यादीने प्राप्त केलेली मंजूरी देखील निरर्थक ठरली आहे. आरोपींच्या विरोधात कोणतीही कायदेशीर जप्ती किंवा कोणतीही दोषी सामग्री स्थापित करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ट्रायल कोर्टाचा निकाल कायद्याच्या हातात टिकणारा नाही. म्हणून आम्ही अपीलांना परवानगी देतो आणि चुकीचा निर्णय बाजूला ठेवतो. सर्व आरोपी निर्दोष सुटतात, असे खंडपीठाने सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article