दिव्य मराठी इनसाइड स्टोरी:भाजपने घर फोडण्याचा प्रयत्न केल्याने हितेंद्र ठाकूरांचा राग, आतेबंधू राजीव पाटलांना फोडण्याचे झाले होते प्रयत्न
1 day ago
1
हितेंद्र ठाकूर यांचे आतेबंधू राजीव पाटील यांना बहुजन आघाडीतून फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. राजीव पाटील दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश करणार होते. नालासोपारा, वसई, विरारमध्ये हे संकेत देणारे होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात आले होते. नालासोपाऱ्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज यांच्याविरुद्ध पाटील यांना निवडणुकीत उभे करण्याची भाजपची रणनीती होती. तिकीट देणार होते. पाटील यांनी निवडणूक लढवली असती तर बविआचे मोठे नुकसान झाले असते. अखेर हितेंद्र ठाकूर यांनी मध्यस्थी करत राजीव पाटील यांची नाराजी दूर केली व त्यांना भाजपत जाण्यापासून राेखले. विधान परिषद निवडणुकीत मदत करूनही भाजपने आपले घर फोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठाकूर यांना राग होता. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्याला अडकवण्याचा त्यांनी डाव खेळला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सीएमपदाच्या शर्यतीतून बाहेर तावडेंकडे सीएमपदाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय. त्यामुळे पक्षातून ठाकूर यांना ‘टीप’ गेल्याचा संशय आहे. तावडेंची प्रतिमा मलिन करण्यात पक्षांतर्गत विरोधक यशस्वी झाले. ते सीएमपदाच्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण त्यात पैसे वाटपाचा आरोप नाही. त्यामुळे तावडेंवर काही ठोस कारवाई होण्याची शक्यता नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)